नांदेड / अर्धापूर २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पुर्व तयारी बैठक.
अर्धापूर(प्रतिनिधी) :उपासिकांनो तपोवन बुद्ध भुमी महाविहार लहान-लोण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था, लोणी (खु.) व अर्धापूर तालुका व जिल्ह्यातील सर्व उपासक / उपासिका यांच्या वतीने २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे.
कालकथीत दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या तपोवन बुद्ध भुमीत धम्म परिषदेचे कार्य अखंडीत पुढे सुरु ठेवण्यासाठी कालवश संजय निवृत्तीराव लोणे यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून, त्यांच्या अनुयायाकडून दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरी करण्यात येत आहे. या निमित्त विविध देशविदेशातील पुजनिय विद्वान भिक्खु संघाच्या मुखातून बुद्धाचे तत्वज्ञान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श व पवित्र विचार समाजाला देण्याचा प्रामाणिक कार्य करीत आहोत. या धम्म परिषदेची पूर्व तयारी बैठक दिनांक ०७ जानेवारी २०२४ रविवार रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. धम्म परिषद यशस्वीतेसाठी आवश्यक त्या सुचना द्याव्यात ही विनंती.
ही बैठक पु. भदन्त पैय्यारत्न (विपश्यनाचार्य) थेरो, पु. भदन्त पैय्याबोधी थेरो, पु. भदन्त सुभूती थेरो, पु. भदन्त शीलरत्न, तसेच महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड (तिर्थक्षेत्र बावरी नगर, दामड) यांच्या उपस्थितीत होईल.
स्थळ : तपोवन बुद्धभुमी, स्वा. से. आबासाहेब लहानकर नगर, लहान-लोण ता. अर्धापूर जि. नांदेड. दिनांक : ०७ जानेवारी २०२४ रविवार, दुपारी २:०० वाजता.
आयोजिका अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे सरपंच लोणी खु. , स्वागताध्यक्ष सभापती संजय देशमुख लहानकर,व संयोजक राजेश लोणे हे आहेत. सर्व श्रद्धावान उपासक उपाशिका यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन संयोजक राजेश लोणे, व ग्रा प सदस्य प्रसन्नजीत लोणे यांनी केले आहे.