उमरखेड विधानसभेसाठी विद्वान केवटे यांना बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवारी जाहीर.
महाराष्ट्रा चीफ = एस.के. चांद यांची रिपोट
मागील दहा वर्षापासून उमरखेड महागाव मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, तरुण, एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, यांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडणारे तरुण – नेतृत्व भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे यांची दि १५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील स्थानिक विश्रामगृह येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रीय मुस्लिम मोचीचे तालुकाध्यक्ष शेख जब्बार, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष मिलिंद चिकटे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सुरज मोरे, राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ जिल्हा अध्यक्ष बाबु राठोड, भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजय बनसोडे, राष्ट्रीय किसान मोर्चा पुंजाराम हटकरे, लहुजी क्रांती मोर्चा राज्य उपाध्यक्ष पुंडलिक तलवारे, छत्रपती क्रांती सेना तालुका अध्यक्ष संतोष पाटील चंद्रवंशी भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे,
या सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीकांत होवाळ यांनी
बोलताना सांगितले या मतदारसंघामध्ये मागील दहा वर्षापासून आम्ही लढाई लढत आहोत,”जो कॅडर असतो तो बेडर असतो व जो बेडर असतो तोच असतो असतो. अशा निडर व्यक्तिमत्वाला ज्यांना सामान्य जनमानसांच्या प्रश्नांची जाण आहे अशा तरुण,उच्चशिक्षीत,
नेतृत्वाला सर्व संघटना व पक्षाच्या नेतृत्वाच्या वतीने विद्वान केवटे यांची उमरखेड महागाव विधानसभेच्या उमेदवार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली,”
असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना म्हणाले बहुजनांची एकही
देशावर मूठभर लोकांचे राज्य आहे. बहुजन समाजांला पर्याय देण्यासाठी या विधानसभेत जाऊन प्रश्न मांडण्यासाठी विद्वान केवटे सारख्या विद्वान व्यक्तीची उमेदवारी जाहीर केली आहे.
तसेच बहुजन मुक्ती पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात १५० विधानसभेत उमेदवार देण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. मतदारांनो आपल्याला आमदार बदलून आपल्या मतदारसंघाचा प्रश्न मिटणार नाही तर पार्टी बदलावी लागणार आहे. संपूर्ण देशावर फक्त मुठभर लोकांनी वर्चस्व केले आहे. कोणत्याही उमेदवाराला निवडून द्या सत्ता त्यांचीच राहणार पक्ष कुठलाही असो फक्त मुठभर लोकांचे राज्य संपूर्ण देशावर राहणार असल्याचेही सांगितले.
आम्ही भावनिकतेने लढत नाही. आम्ही जाणीवपूर्वक लढत आहोत.तसेच आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत. असे ही बोलताना सांगितले.
यावेळी विद्वान केवटे यांनी बोलताना,”समाजामध्ये काम करणारे नेतृत्व असावे.म्हणून येथील अनेक सामाजिक संघटनांनी व बहुजन मुक्ती पार्टीने माझ्यावर येथील निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात मला ३०० लोकांनी निवडणूक लढण्यासाठी स्वखर्चाने घरच्या भाकरी बांधून चार चाकी वाहने प्रचारासाठी व प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये देण्याचे ही सांगितले आहे. माझं नेटवर्क उमरखेडच्या १०० गावांमध्ये तर महागावच्या ९० गावांमध्ये आहे या सर्वांनी मला पाठबळ दिलं आणि बहुजन मुक्ती पार्टीने उमेदवारी जाहीर करून माझ्यावरती जबाबदारी दिली आह.
तसेच ही निवडणूक आम्ही उमरखेड महागाव मतदार संघात मोठ्या संघटन शक्तीने लढू व केंद्रस्तरावरची भारत मुक्ती मोर्चाची ताकद आम्ही उमरखेड मतदार संघामध्ये माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनात लावणार आहोत. तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेंद्र प्रतापसिंग हे सुद्धा उमरखेड मतदार संघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान येणार असल्याचे सांगितले.
मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, रोजमजूर, विद्यार्थी, तरुण व जनसामान्यांच्या समस्या पहिले सोडवल्या जातील.असे १०० रुपयाच्या बॉण्डवर लिहून दिल्या जाईल. असे विद्वान केवटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या युवा उच्चविद्याविभुशित नेतृत्वाला उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.