महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.
५९ हजार रुपयांचा गुटखा जप्त,
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.
प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील एका गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२९) जुलै रोजी धाड टाकून दुकानातून प्रतिबंधित गुटखा तंबाखु असा एकूण ५९ हजार ७२६ रुपयांचा सुगंधित तंबाखू गुटखा जप्तu केला.
प्राप्त माहितीनुसार महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील दुकानात प्रतिबंधित गुटखा तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील विठ्ठल दत्ताराव बेलखेडे (वय ५४) यांच्या दुकानात धाड टाकून दुकानाची चौकशी केली असता दुकानात विविध कंपनीचे प्रतिबंधित तंबाखू गुटखा आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा तंबाकू जप्त करून सदर मुद्देमाल महागाव पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी महागाव पोलिसानी विठ्ठल दत्ताराव बेलखेडे वय-५४ वर्ष रा. प्रभाग क्र. ९ याच्या विरुद्ध कलम १२३, २७४, २५७, २२३, भा. न्या. सा.
अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६, २०११ ची कलम
२६ (२) २७ (३) सह कलम ३० (२)- ए ५९, नुसार गुन्हा दाखल केला सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकाते, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे गजानन गजभारे, सुभाष जाधव, तेजाब रनखांब, रमेश राठोड, कुणाल मुंडोकर, मोहम्मद ताज, रवींद्र श्रीरामे यांनी पार पाडली.