यवतमाळ/ महागांव येथे सरकारची काढली प्रेत यात्रा सकल मराठा समाज झाला आक्रमक.
महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख.
महागांव / महागाव शहरामध्ये सरकारची काढली प्रेत यात्रा,पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी महागांव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी (दिनांक ०८/2023) शुक्रवार रोजी छञपती शिवाजी महाराज चौक ते छञपती संभाजी महाराज चौकापर्यंत सरकारची प्रतिकात्मक प्रेत याञा काढण्यात आली, मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला इशारा, आरक्षण आमच्या हक्काचे ,नाही कोण्याच्या बापाचे,जय जिजाऊ ,जय शिवराय ,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सरकारची प्रतिकात्मक प्रेत याञा काढून मराठा समाज आक्रमक झाला महागाव शहरात पोलिसांचा बंदोबस्त होता यावेळी महागांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव,यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना यावेळी साहेबराव पाटील कदम, उदय नरवाडे, शैलेश कोपरकर, शाखा भरवाडे, तेजस नरवाडे, नितीन पाटील नरवाडे, दिनेश पाटील नरवाडे,संजय कोपरकर,सतीश ठाकरे,प्रवीण ठाकरे,संदीप ठाकरे, व गोविंदराव देशमुख राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांनी व ईतर सर्व नागरीक उपस्थित होते.