ताज्या घडामोडी

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप. 

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप.

 

उमरखेड .तालुक्यातील अमृतेश्वर संस्थान हरदडा या ठिकाणी श्रावण मासा निमित्त एक महिना भर ओम नम शिवाय असे नामस्मरण करण्यान येणार आहे.याची सुटावत्त १७ऑगस्ट पासून होणार आहे.तरीही परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतेश्वर संस्थान चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या सुरवातीला पिंपळगाव येथील महंत बाल योगी व्यंकट गिरी महाराज आले होते .या वेळी परिसरातील भाविकांनी महंत व्यंकट गिरी महाराज यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.उद्या पासून सलग एक महिना भर ओम नामाचा जप केला जाईल आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याने परिसरातील भाविकांनी आपल्या पद्धतीने सहकार्य करावे असे आवाहन अमृतेश्वर संस्थान चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले आहे.या वेळी अड संतोष जैन यांनी १००किलो गहू ५०किलो तांदूळ तेल देण्याचे जाहीर केले.परिसरातील नागरिकांचे सहकार्य फार आवश्यक असल्याचे महंत व्यंकट गिरी महाराज यांनी सांगितले आहे.यावेळी उमरखेड तालुका पोलीस पाटील अध्यक्ष बाळू पाटील गजू पाटील गाडेकर प्रवीण पाटील धानोरकर युवराज पाटील देवसरकर विनायकराव पाटील माने कल्याण पाटील किसनराव जाधव बापूराव पाटील, माधवराव पिलवड पत्रकार विश्वास पाटील, अशोक गायकवाड उपस्थित होते.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *