महागांव – अनंतवाडी येथील पूरग्रस्त पीडितांना TDRF द्वारा आपत्ती ग्रस्तांना मेडिकल किट चे वाटप
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरात पाणी घुसून नागरिकांना बेघर व्हावे लागले. त्यांच्या या परिस्थितीत प्रशासनाद्वारे त्यांना स्थलांतरित करून त्यांची मदत केली जात आहे. अश्यातच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील 18 वर्षापासून कार्यरत TDRF द्वारा महागाव तालुक्यातील अनंतवाडी व आनंदनगर येथील पूरग्रस्त (पीडित) नागरिकांची माहिती घेऊन TDRF मुख्यालयाच्या वतीने TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात तेथील स्त्रियांना मेडिकल किटचे वाटप TDRF महागाव कंपनीच्या अधिकारी व जवनानकडून करण्यात आले. त्या मेडिकल किट मध्ये डेटॉल साबण, डेटॉल लिक्विड, सॅनिटरी पॅड, बँडेजेस, आय ड्रॉप, पॅरासिटामॉल टॅबलेट, सिपला डाइन पावडर इत्यादी. जीवनावश्यक वस्तू होत्या.
सदर मेडिकल किट वाटप कार्यक्रमाच्या वेळी अनंतवाडी चे सरपंच श्रीराम कव्हाने व उपसरपंच कुणाल राठोड सोबतच TDRF महागाव कंपनी कमांडर आविष्कार बागल, रोहित कदम, संजीवनी पवार, स्वराज पवार, आदित्य जिल्हरवार,रोहित तळणकर, जय जाधव, शिवम चव्हान, भारत राठोड, दुर्गेश घोडे इ. TDRF अधिकारी व जवानांनी मेडिकल कीटचे वाटप केले.त्यावेळी गावकरी उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख