महागांव / भोसा येथील विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त
महागांव/ तालक्यातील भोसा येथे विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. मागील पंधरा ते वीस दिवसापासुन विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, व नेहमीच्या लोडसिटींग ने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाळ्यामध्ये पीण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. लोडसिटिंग मुळे घरच्या मोटारी चालत नसल्याने गावातील नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावातील विज पूरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा अशी मागणी गावातील सरपंच जयश्री चव्हाण, डेव्हीड म्हातारमारे, आकाश खंदारे, अंबादास होलगरे, यांनी निवेदना तून केली आहे. प्रती )
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख