उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.
पोफाळी प्रतिनिधी, सुहास खंदारे : वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक यांच्या जन कार्यालयासमोर दोन मागण्यांसाठी वसंत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे मत व्यक्त करत वसंत कामगार युनियननी आपले उपोषण स्थगित करत आता पुढील लढाई कायदेशीर मार्गानेच लढण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे व त्री पक्षीय करार करावा या दोन मागण्यांसाठी वसंत कामगार युनियनने 9 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक योगेश गोतरकर यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण सुरू होते उपोषणाच्या 17 दिवसाच्या कालखंडात खासदार हेमंत पाटील,भैरवनाथ शुगर वर्क्सचे प्रितेश पाटील, सरकारी कामगार अधिकारी व पुणे येथील साखर आयुक्त कार्यालय यांच्यात बैठका झाल्या मात्र एकाही बैठकीत कामगारांच्या बेमुदत उपोषणावर समाधानकारक तोडगा निघाला नसल्यामुळे कामगारांनी आपले उपोषण कायम ठेवले होते 9 फेब्रुवारीला 16 कामगारांनी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला दरम्यान प्रकृती खालावल्यामुळे 16 ही कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतरही कामगारांनी आपले बेमुदत उपोषण कायम ठेवले एकूण 23 कामगारांनी उपोषण केले.
24 फेब्रुवारीला यवतमाळच्या सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात वसंत कामगार यांचे दोन प्रतिनिधी अवसायक योगेश गोतरकर यांच्यात एक बैठक पार पडली या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, चर्चांती सरकारी कामगार अधिकारी यांनी कामगार प्रतिनिधींना तुम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून लढाई करावी लागेल असे मत व्यक्त केले त्यावर वसंत कामगार युनियनने आपले उपोषण स्थगित करत पुढील लढा हा कायदेशीर मार्गानेच लढू असे एकमत करत आज शनिवारी दुपारी साडेतीन वाजता उपोषणाची सांगता केली यावेळी विलास चव्हाण,देवानंद मोरे व बालाजी वानखेडे यांच्या हस्ते उपोषण कर्ते सतीश पायघन, संतोष शिंदे व शिवाजी मांगुळकर यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली.यावेळी पि.के.मुडे, व्ही. एम.पतंगराव, विनोद शिंदे,विलास चव्हाण,बालाजी कोपरेकर,देवानंद मोरे,पी.डी. देशमुख, बाळकृष्ण देवसरकर,संतोष जाधव,प्रकाश जाधव यांनी पुढाकार घेतला.