खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूरला घेतली आढावा बैठक..!
रखडलेल्या विकास कामाबाबत केली अधिकारी उपाधिकाऱ्यांसोबत चर्चा…!
श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर
माहूर येथे हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखडा बाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी जाय मोक्यावर जाऊन माहूर विकास आराखड्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा अहवाल घेऊन येण्याबाबत सुचवलं होतं.त्यानुसार दिनांक 16- 6- 2025 रोजी त्यांनी माहूर विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांशी सांगोपांग चर्चा केली .
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी, जिल्हा युवा सेना उपप्रमुख यश खराटे,जेष्ठ पत्रकार नंदू संतान, नंदगावचे ज्येष्ठ शिवसैनिक भुजंगराव पाटील, इत्यादी मान्यवर सहित रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कांनव उपस्थित होते. यावेळी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर सोमवार दिनांक 23/6/2025 रोजी माहूर विकास संबंधित सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक लावण्यात आली असून त्यावेळी अद्यावत विकास आराखडे व रखडलेल्या कामाविषयी निर्णय घेण्यात येतील.असे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदारांच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास,मालवाडा घाट, व धानोडा पूल,गाजला.हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दिनांक 16- 6- 2025 रोजी माहूर विश्रामगृहावर महत्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये जिल्हा शिवसेनाप्रमुख ज्योतिबा खराटे, यांनी दहा वर्षापासून कुंभकर्णी झोपेमुळे रेंगाळलेला मालवाडा घाट रस्ता, पैनगंगा नदीवरील जीर्ण पूल,व माहूर शहरातील पाच वर्षापासून प्रलंबित असलेले विद्युत रोशनी खांब, व राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामे, याकडे लक्ष वेधून या सर्व संबंधितांना सोमवार दिनांक 23 /06/2025 रोजी पुन्हा एकदा बैठक लावून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती केली. विनंती केल्यावरून खासदार महोदयांनी पुढील बैठकीस खऱ्याखुऱ्या माहितीसह उपस्थित राहावे असे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.




