ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय.
ब्युरो रिपोर्ट ढाणकी / आजीज खान
सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग आयुक्तालय पुणे क्रीडा संचनालय पुणे व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग मुलामुलीचे राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असता राज्यातून दिव्यांगाच्या सर्वच प्रवर्गाच्या विध्यार्थी नी जे जिल्हा स्तरावरून प्रथम आले होते त्या सर्वच दिव्यांग स्पर्धेकांचा या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग होता या मध्ये मधुकरराव नाईक निवासी बधिर विद्यालय ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील विध्यार्थी करण नामदेव राठोड याने मूक बधिर प्रवर्गाच्या 17 ते 21 या वयोगटात लांब उडी या खेळात राज्यातून द्वितीय येऊन विद्यालयासह जिल्ह्याची मान उंचावली असून त्याच्या या यशा बद्दल सर्वच स्तरावरून करण वर कौतुक होत असून स्व. चांदीबाई शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री शेषराव पवार साहेब व सदस्य श्री सुदर्शन भाऊ पवार यांनी विध्यार्थी करण राठोड व क्रीडा शिक्षक श्री एस. आर. आडे सर यांचे अभिनंदन केले असून विध्यार्थीनी आपल्या या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक आडे सर व मार्गदर्शक श्री शंकर चव्हाण सर यांना दिले आहे