पोफाळी /वसंत साखर कामगार युनियनचा एल्गार कामावर घ्या अन्यथा आमरण उपोषण
पोफाळी : कारखान्याची देखभाल दुरुस्तीचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन कारखान्याचा गळीत हंगाम 31 जानेवारी रोजी सुरू झाला मात्र अद्यापही जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आले नाही त्यामुळे वसंत कामगार युनियन आक्रमक होत कामावर घेण्यासंदर्भात उपोषणाचा इशारा दिला 9 फेब्रुवारी पासून आमरण उपोषनाचा एल्गार पुकारत कामगारांनी अवसायक प्रतिनिधीला भेटून निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे कारखाना परिसरात वातावरण तापले आहे.
उच्च न्यायालय नागपूर यांनी याचीका क्रमांक 15 11/21 दिनांक 30/8 /2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार भाडेकरू सोबत त्रि पक्षीय करार करण्याचे मान्य करूनही करार न केल्याने कामगारांना कामावर घेण्यात आले नाही सोबतच कारखान्याची देखभाल दुरुस्तीचे काम नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू होऊन कारखान्याचा गळीत हंगाम दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सुरू झाला तरीही अवसायक यांनी कार्यरत कामगारांना कामावर घेण्यासाठी कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे बेरोजगार असलेल्या व उपासमारी जीवन जगत असलेल्या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही त्यामुळे कामगाराच्या हक्कास बाधा आली असून कामगार कायद्याचे व झालेल्या कराराचे अवसायकांनी सततपणे उलंगण केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे असा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
अवासायक प्रतिनिधी अरुण भालेकर यांना गुरूवारी वसंत साखर कामगार युनियचे अध्यक्ष पि.के मुडे यांच्या नेतृत्वात विनोद शिंदे, प्रमोद विठ्ठल कांबळे, शिवाजी बाबुराव वाकडे, गजानन वसंतराव देवगुंडे, आनंद वामनराव सरकाटे,अनिल कैलास मांगुळकर,बळीराम शेषराव राठोड, चंद्रशेखर लक्ष्मण धुमाळे,रफिक पटेल, आत्माराम सटवा दोडके, कैलास विठोबा मांगुळकर, आयुब खुर्शिद मिया पटेल, संजय पांडुरंग ढोले, पुंडलिक बालाजी सूर्यवंशी,ज्ञानेश्वर साहेबराव सूर्यवंशी,रवी गंगाधर कोंढुरकर, मारुती रामराव चव्हाण,प्रमोद हरिभाऊ काळे, सतीश गोविंदराव पायघणे,बळवंत देवराव वाहुळे,कैलास नामदेव चव्हाण,भानुदास देविदास चव्हाण,संतोष दिगंबर शिंदे व नागोराव शंकर खंदारे इत्यादी कामगार निवेदन देताना उपस्थित होते. दिलेल्या निवेदना नुसार कामगार नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजता पासून अवसायक वसंत साखर कारखाना यांच्या प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
सर्व कामगार कामावर घेण्याबाबत बंधनकारक असताना कामगारांनी कारखाना सुरू व्हावा म्हणून प्रथम आंदोलन सुरू केले गेल्या पाच वर्षापासून कारखाना सुरू होईल व कामगाराच्या हाताला का मिळेल अशी आशा बाळगत असतांना कामगारावर फार मोठा अन्याय झाला अशा भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या.
मी आज भैरवनाथ शुगर वर्क्स यांना पत्र देणार असून मी वसंतच्या कामगारांना प्रथम प्राधान्याने कामावर घेण्यात यावे अशी विनंती करणार आहे.
योगेश गोतरकर,सायक वसंत सहकारी साखर कारखाना तथा विशेष लेखापरीक्षक श्रेणी एक यवतमाळ.
ब्योरो रिपोट / सुहास खंदारे यांची रिपोट