स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे संविधान दिवस व शहिद दिन संपन्न.
उमरखेड प्रतिनिधी:: सुभाष वाघाडे
आज दि.२६-११-२०२२ला स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे संविधान व शहिद दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले त्यानंतर संविधानाची सर्वांनी शपथ घेतली तसेच मुंबई बाॅम्बस्फोटातील शहिद हेमंत करकरे व सोबतच्या शहिदांना मौन पाळून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी चितांगराव कदम मा.सदस्य जि. प.यवतमाळ, सविता कदम माजी सभापती,रामा ठेंगे सरपंच, रमेश कुरमे अध्यक्ष शा. व्य. स. प्रकाश शिंदे मुख्याध्यापक, बापुराव कुरमे उपाध्यक्ष, डॉ. विनय चव्हाण सर,बाळु पवार सर, बालाजी कदम सर, गोविंद घुले सर, डॉ. अंबादास कदम अध्यक्ष पर्यावरण समिती,बाळु जाधव उपाध्यक्ष शा. व्य. समिती, मारोतराव कदम पोलिस पाटील, रावसाहेब कदम, संदीप कुरमे, गुणवंत कदम, प्रताप आडे रोजगारसेवक, शंतनु ठेंगे व विद्यार्थी,गांवकरी उपस्थित होते संचालन व आभारप्रदर्शन डॉ.विनय चव्हाण सर यांनी केले.