घाटंजी / पारवा वनपरीक्षेत्र कार्यालया समोरील उपोषणाची सांगता.
वनपरीक्षेत्र अधिकारी व ठाणेदार यांच्या चर्चेअंती माघार.
घाटंजी प्रतिनिधी – तालुक्यातील पारवा वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सायफळ बिट मध्ये कार्यरत वनरक्षक यांनी सुडबुद्धीने कार्यवाई केल्याचा ठपका ठेवत गोविंदपूर येथिल अमोल मोहनराव राठोड यांनी दिनांक २८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले होते.यात पारवा वनपरीक्षेत्र अधिकारी मनीष पवार आणी पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी उपोषण कर्त्यासोबत चर्चा करून दिनांक ३० नोव्हेंबर रोजी ज्यूस देऊन उपोषणाची सांगता केली.
सायफळ वनरक्षकाने उपोषण कर्त्याचे ट्रॅक्टर पकडून पारवा कार्यालय परिसरात आणून लावल्यामुळे हा प्रकार माझा जुना वचपा काढण्यासाठी व मी पैसे न दिल्याचे कारण पुढे करून अमोल राठोड यांनी पारवा वनपरीक्षेत्र अधिकारी यांचे सह वरिष्ठ अधिकारी यांचे कडे लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती. मात्र कोणतीच चौकशी न झाल्याने ते वैतागून दिनांक २८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणास पारवा वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बसले होते.त्यांना वनपरीक्षेत्र अधिकारी मनीष पवार व वनपाल मेश्राम यांचे कडून पहिल्या दिवसापासून समज देऊन उपोषण माघार घेण्यास सांगण्यात आले मात्र ते आपल्या मागण्यावर ठाम होते.अखेर पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दोन्ही बाजूने विचार करून उपोषण कर्त्यास समज देऊन त्यांच्या मागणीवर तोडगा काढल्याने उपोषण कर्त्याचे समाधान झाले त्यामुळे त्यांनी उपोषण सोडण्यास होकार दिला.व उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वनपरीक्षेत्र अधिकारी मनीष पवार,,ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी कुर्ली वनवर्तुळाचे वनपाल मेश्राम,वनरक्षक सरोदे पोलीस कर्मचारी वाढई यांचे सह वनविभागातील कर्मचारी उपस्थित होते.