आरोग्य क्राईम डायरी

उमरखेड / ब्राह्मणगांव ते हरदडा मध्य रस्त्यात दुचाकीच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी.

 

उमरखेड प्रतिनिधी / सुभाष वाघाडे

 

औरंगाबाद माहूर राष्ट्रीय महामार्गावर ब्राह्मणगाव ते हरदडा रानात बकऱ्या चारून सायंकाळी घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव धोचाकीच्या धडकेत पुंजाराम पिराजी निरडवाड वय साठ वर्ष या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चे दरम्यान घडली ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेले मृतक पुंजाराम निरडवाड ही रानातून आपल्या बकऱ्या चारून रस्त्याने घराकडे येत असताना माधव दिगंबर वाघमारे एम एच 26 ए जे 65 35 या क्रमांकाच्या जोरदार धडक लागल्याने पुंजाराम हा गंभीरित्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तेव्हा गावकऱ्यांनी उमरखेड येथे शासकीय रुग्णवाहिका बोलावून उत्तरवार शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यास मृत घोषित केले या घटनेची माहिती प्राप्त होताच उमरखेड पोलीस स्टेशनचे अमोल माळवे साहेब यांच्या मार्गदर्शनात ब्राह्मणगाव बीड जमादार रोशन सरनाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यूस जबाबदार असलेल्या निष्काळजी पणे वाहन चालवणार्‍या दुचाकी चालक यांची विरुद्ध भांदवी 279 / 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उमरखेडचे बीड जमादार करीत आहेत

 

उमरखेड शहर प्रतिनिधी /अन्नपूर्णा बनसोड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *