उमरखेड/दिलीप शिरसाट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.रिपब्लिकन युवा सेना तर्फे त्यांचे स्वागत
उमरखेड शहर प्रतिनिधी/ अन्नपूर्णा बनसोड
उमरखेड पोलीस स्टेशन येथे मागील आठ वर्षापासुन कार्यकरत असलेले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेले दिलीप शिरसाट साहेब यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे आणि त्यांच्या मागील सेवा कार्याबद्दल रिपब्लिकन युवा सेना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे कौतुकस्पद शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून समारोप पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर, शुद्धोधन दिवेकर, बंडू साखरे, गौतम नवसागरे, साहेबराव कदम, दिलीप मुनेश्वर, बनसोडे ताई व मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.