अर्धापुर न.पं.अंतर्गत डब्ल्यु.बी.एम.आणि हॉट मिक्स रोडची चौकशी करा अनेथा मा न्यायालयात दाद मागेल मुदासीर बैग
नांदेड अर्धापूर प्रतिनिधी/
अर्धापूर :–नगरपंचायत सहाय अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेपासून ते घनकचरा व्यवस्थापन कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे
या जाणाऱ्या रस्त्याचे काम माऊली कंस्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ट दर्जाचा व बोगस करण्यात आला आहे अर्धापुर नगर पंचायत बांधकाम1 अभियंता व गुत्तेदार यांनी अंदाजे ४० ते ४५ लाखाचा निधी त्या रस्त्याच्या कामासाठी आला असून तेवढा निधी खर्च न करता रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस केले आहे. रस्त्याचे काम चांगले न करता गुत्तेदार व नगरपंचायत साज बांधकाम अभियंता यांनी संगणमत करून निधीचा भ्रष्टाचार केला आहे. त्या झालेल्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधिताविरोध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.असे मुदस्सरउल्ला मजहरउल्ला बेग यांनी केले.रस्त्याच्या कामात काही ठिकाणी मुरुम टाकले काही ठिकाणी मुरुम टाकले नाही जिथे मुरूम टाकलं त्यावर रुलरने दबई न करता गुत्तेदारांनी त्या रस्त्यावर ढब्बर सुद्धा टाकला नाही.गुत्तेदारांनी आपल्या मनमाणीने रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा व बोगस केल्यामुळे काही दिवसातच रस्ता उकळून गेला आहे रस्ता बरोबर न करता जगच्या जागी मुरुम उकरून थात्तर मात्र करत व तसेच या रस्त्यावर डांबरचा कमी प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे त्या रस्त्याच्या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास अर्जदार न्यायालयात दात मागणार आहे असे अर्जदार पत्रकार परिषदेत सांगितले आहे