हिमायतनगर /मगरूळ येथे crpf जवान विठ्ठल सुब्रमवाड यांचे जंगी स्वागत.
हिमायतनगर प्रतिनिधी विकास गाडेकर.
तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील किशनराव गुरगुटवाड यांचा पुतण्या सतिश विठ्ठल सुब्रमंवाड यांची CRPF जवान मधी निवड झाली आणि ते ट्रेनिंग पूर्ण करून काही दिवस सुट्टी साठी आपल्या गावी मंगरूळ येथे परत आले.त्या निमित्त सर्व मंगरूळकर वासियांतर्फे जि.प.कें.प्रा. शाळा मंगरूळ येथे एक छोटेखाणी सत्कार कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सरपंच प्रतिनिधी जीवन दादा जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पावडे,सोसायटी संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबेकर, मारोती सोमंवड, माजी उपसरपंच विलास सादलवाड, दयाकर सुडेवाड
शालेय व्यवसथापन समितीचे उपाध्यक्ष पोतना अकेमवड, गोविंद पांडलवाड, युवा मित्रपरिवार प्रदीप परमेट्वाड, नारायण सादलवाड, देवानंद किशोर पेंटेवाड, करण आंबेकरकुंजरवाड, पवन गुर्लेवाड, ओमकार कुंजरवाड , रुद्र गुलझरवाड व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व गुरुजन वर्ग उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन अंकुश अंबेकर यांनी केले.