राजकारण

हिमायतनगर शहरातील वार्ड क्र 13 मध्ये फेरोज खुरेशि यांच्या कडून टँकरने पाणी पुरवठा सुरू..

हिमायतनगर शहरातील वार्ड क्र 13 मध्ये फेरोज खुरेशि यांच्या कडून टँकरने पाणी पुरवठा सुरू..

?? उन्हाळ्यात सुद्धा भासू दिल्या नाही पाणी टंचाईच्या झळा…

 

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.13 मधील सामाजिक कार्यकर्ते तथा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशि यांनी येथील महिलांना मागील अनेक वर्ष पासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होते त्यामुळे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रं 13 मध्ये स्वखर्चातून उन्हाळा भर येथील नागरिकांना टँकरने मोफत पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागवली व यांना कसल्याही प्रकारच्या पाणीटंचाईच्या झळा पोहचु दिल्या नाहीत असे येथील नागरिकांनी सांगितले

हिमायतनगर शहरातील नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक वार्डासाठी नगरपंचायत प्रशासनाने यावर्षी कुठल्याही प्रकारचे नियोजन किंवा पाणी पुरवठा आराखडा तयार केला नसल्यामुळे शहरातील असंख्य वार्डातील नागरीकांना ह्या वर्षी पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत याला सर्वस्वी येथील प्रशासन जबाबदार असल्याचे संबंधित वार्डातील राजकीय कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे वार्ड क्रं 13 मधील सामाजिक कार्यकर्ते तथा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशि यांनी स्वखर्चातून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात इतरत्र भटकंती करावी लागू नये म्हणून वार्डात मागील 4 महिन्यापासून दररोज टँकरने मोफत पाणीपुरवठा करून येथील नागरिकांची तहान भागवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले

 

यावेळी, सलीम खूरेशी ,अय्यूब खूरेशी ,अमीन भाई ,सय्यद शमशीर भाई ,महेबूब खूरेशी, अमोल शिंदे ,शेख मतीन , नय्यूम खूरेशी ,शेख आरीफ, अजय बनसोडे, शेख अलीम , अत्ताउल्लाह खान , सिराज पार्डिकर ,अजर खूरेशी,

सह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *