ताज्या घडामोडी

अमरावती/ येथे महावितरणचे कर्मचारी यवतमाळ जिल्ह्यातील २१ जनाचा गुणवंत पुरस्कारामध्ये समावेश

अमरावती/ येथे महावितरणचे कर्मचारी यवतमाळ जिल्ह्यातील २१ जनाचा गुणवंत पुरस्कारामध्ये समावेश

 

महाराष्ट्र मेंबर /एस के शब्बीर

 

महावितरण अमरावती येथे परिमंडळात उत्कृष्ट काम करणारे जनमित्र व यंत्रचालक अशा २१ कर्मचाऱ्यांना परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या हस्ते ‘ गुणवंत कामगार ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ‘ विद्युत भवन ‘ अमरावती येथे हा गुणवंत पुरस्कारांनी कार्यक्रम पार पडला . त्यानंतर वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट सेवा देणारे जनमित्र व यंत्रचालक अशा २१ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र , देऊन व सन्मानचिन्ह व पुष्प देऊन ‘ गुणवंत कामगार ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . महावितरणची सेवा ही निरंतर चालणारी आहे . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन कामाप्रति असलेली निष्ठा व समर्पित वृत्ती ही कायम ठेवावी असे प्रतिपादन करत मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी सर्व सन्मानित कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले . अधिक्षक अभियंता दिपक देवहाते व कार्यकारी अभियंता आनंद काटकार यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता दिपक देवहाते , कार्यकारी अभियंते आनंद काटकर , भारतभूषण औघड , अनिरुध्द आलेगावकर , राजेंद्र मळसने , प्रणाली विश्लेषक नितीन व्यवस्थापक सुहास देशपांडे , अतीरक्त कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे , यज्ञेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी अभियंते कर्मचारी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *