माहूर तालुक्यामध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या.
नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
माहूर काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन.माहूर किनवट तालुक्यामध्ये दिनांक 15, 16 ,व 17 रोजी रात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे, पशुधन ,शेती उपयोगी अवजारे, व इतर साहित्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले त्याचा अनुषंगाने माहूर काँग्रेसचे युवा नेते, डॉक्टर निरंजन केशवे, यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी केली व दिनांक 19 रोजी डॉक्टर निरंजन केशवे, यांच्या नेतृत्वामध्ये माहूर तहसीलदार यांना झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना शासनाकडून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी
विमुक्त भटक्या सेलचे जिल्हाध्यक्ष किसन दामा राठोड, माहूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख शिवुरकर, जयकुमार अडकिने, प्रवीण भीमराव बरडे, सामाजिक कार्यकर्ते शे. रफिक ,निसार कुरेशी ,राजू सौंदलकर, विक्रम भगत, अरविंद खंदारे, भारत राठोड ,संजय गायकवाड, गणेश भीमराव भगत ,देवानंद गोविंदराव जाधव ,कुंडलिक नागोराव तोडसाम ,संतोष कोंडबा मुसळे, ईश्वर बापूराव काळे, प्रवीण विष्णू काळे ,सुभाष नामदेव इंगोले, सुधाकर देवराव मुंडे, ओम देविदास राऊत, व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.



