महाराष्ट्र शासन वन विभागाचे 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे हदगाव तालुक्यात उडला बोजवारा
हदगाव / शेख अतिक यांची रिपोट
महाराष्ट्र शासनाने वनविभागांतर्गत पूर्ण महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता पण या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यात हरताळ फासण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसून येत आहे.
संबंधित वनपरिक्षेत्र प्राधिकरण कार्यालय हदगाव येथे आज माहिती घेण्याकरिता गेले असता कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता तसेच या कार्यालयात 2019 मध्ये पावसाळी अंतर्गत तालुक्यातील गाव निहाय वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेण्यास संबंधीचे बोर्ड फलक आहे त्या स्थितीत कार्यालयाच्या आवारात पडून दिसून आले तर या आलेल्या निधीचा पूर्णपणे विल्हेवाट लावल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. फलकच जर कार्यालयाच्या आवारात आहेत तर त्या नियत क्षेत्रात वृक्ष लागवड झाली की नाही याबाबत साशंकता व्यक्त निर्माण होत आहे.