क्राईम डायरी

महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

 

 

प्रतिनिधी एस.के शब्बीर महागांव

 

 

युवकाने राहत्या घरी गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना दि.३मार्च रोजी हिवरा(संगम)येथे घडली.

महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील अभिजित ज्ञानेश्वर कदम(वय२१वर्षे)याने दिनांक ३मार्च२०२२(गुरूवार)ला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घरी कोणीच नसल्याचे पाहुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली .अतिशय मनमिळावु स्वभावाच्या अभिजीतच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.आत्महत्येची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामिण रुग्णालयात पाठविला आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर हिवरा येथील मोक्षधाम मध्ये मृतदेहावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेचा तपास ठाणेदार विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संतोष जाधव करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *