हिमायतनगर येथे ओम शांती सेंटर वर शिव संदेश कार्यक्रम संपन्न.भव्य शोभायात्रा काढून महाशिवरात्री साजरी..
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर येथील प्रज्ञापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय ओम शांती विद्यालय सेंटरच्या वतीने दि.1 मार्च च्या महाशिवरात्रीचे अवचित्य साधून स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शिव ज्योतिर्लिंगाची शोभायात्रा व भारतीय सनातन दैवी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी नारायनाची भव्य शोभायात्रा काढून शिव संदेश देण्यात आला
यावेळी शहरातील नागरिकांनी शिव ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले व पूजा-अर्चना केली सर्वप्रथम शहरातील मुख्य रस्त्याने ही शोभायात्रा मिरवणूक काढून हिमायतनगर निवासीयांना ईश्वरीय संदेश देण्यात आला तसेच व्यसनमुक्ती साठी जनजागृती सुद्धा करण्यात आली आपल्या दुःखाचे मुख्य कारण पाच मनोविकार आहेत काम ,क्रोध , लोभ, मोह ,अहंकार यांचा त्याग करणे म्हणजेच शिवाला प्रसन्न करणे होय अशा 5 अवगुणांना आणि आपल्यातल्या दूरव्यसनांना सोडण्यासाठी राजयोगाचा अभ्यास करणे वर्तमान काळासाठी फार मोठी गरज आहे असा संदेश ब्रह्माकुमारी कडून देण्यात आला .
त्यानंतर ब्रह्माकुमारीज केंद्रावरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर येथील सा .पोलीस निरीक्षण बालाजी महाजन यांनी ध्वजारोहण केले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले व तसेच महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर ब्रह्माकुमारी शितल दीदी यांनी ईश्वराचा सत्य परिचय पत्र देऊन सर्वांना ईश्वरीय संदेश दिला व सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या