नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे गट क्रमांक 193 मधील शंभर ब्रासची रॉयल्टी काढून हजारो ब्रास अवैध उत्खनन केले त्याची चौकशी करा.
असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब कार्यालय नायगाव यांना देण्यात आले भा.मराठा महासंघ नांदेड ग्रा.जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा.पवार होटाळकर यांनी केले.नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे गट क्रमांक 193 मधील 100 ब्रासचि रॉयल्टी काढून हजारो ब्रास अवैध उत्खनन केले आहे तरी त्याची ई टी एस मशीन द्वारे मोजमाप करून संबंधित गुत्तेदार अंकुश पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी व तलाठी मुधुळे व मंडळ अधिकारी शेख यांना तात्काळ निलंबित करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन मा उपविभागीय अधिकारी साहेब कार्यालय नायगाव जिल्हा नांदेड यांच्याकडे देण्यात आले असून त्याची एटीएम मशीन ची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर अंकुश पवार व तलाठी मुधुळे व मंडळ अधिकारी शेख यांनी शासनाची घोर फसवणूक केली असून सदर प्रकरणाची व उत्खणान केल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी संबंधित तलाठी यांना कॉल केले असता मला माहिती नाही कोण काढत आहे व कुठे काढत आहे त्याविषयी माझी कुठलीही स्वाक्षरी लागत नाही व मंडळ अधिकारी फोन घेण्यास तयार नाहीत तरी संबंधित अधिकारी मुरूम माफियांना बळ देत असल्यामुळे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक 26 /1/2022.रोजी आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी दिला