क्रीडांगण

महागांव तालुक्यातील खडका येथील जिल्हा प.प्रा. म.शाळा आजादी का अमृत महोत्सव साजरा.

महागांव तालुक्यातील खडका येथील जिल्हा प.प्रा. म.शाळा आजादी का अमृत महोत्सव साजरा

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

खडका या गावात जिल्हा परिषद शाळेत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव. उत्साहात साजरा नागा फोटा येथील आदर्श व उपक्रमशील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव उपकर्म उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये. विद्यार्थ्यांनी रांगोळी काढली तोरण बांधले आकाश कंदील लावणे दिवे लावले. ग्रीटिंग बनवणे असे उपक्रम राबवून शाळा दिवाळी सणासारखी सजवली..

 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.दत्‍तराव कदम होते. तर उद्घाटक तथा मार्गदर्शक महागाव पं. स चे गट शिक्षणअधिकारी मा. किशोर रावते साहेब होते. तर प्रमुख मा. बबनराव बोडके. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. यतीन पुरोहित. उपाध्यक्ष जगदीश खामकर. शिक्षण बाल तज्ञ डॉ संदीप शिंदे. सदस्य संतोष देशमुख उपस्थित होते.

 

हा दीपोत्सव कार्यक्रम पाहून मा. किशोर रावते साहेबांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व मार्गदर्शनही केले तसेच बबनराव कोरके. यांनी विद्यार्थ्यांना ग्रीटिंग बनवण्यासाठी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात दत्तराव कदम यांनी शासनाचा जीआर नुसार सर्व उपक्रम शाळा राबवत असल्याने अनेक पुरस्कार मिळाले आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संपादक प्रदीप गावंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनुप पंडित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. निलेश रावेकर. कुणाल भगत. शितल वाघमारे. माधव मारटकर. या सर्व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना फळ फ्रुट वाटप केले व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 72 व्या संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खडका या सर्व अध्यक्ष सध्यक्ष व विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांनी डॉक्टर बाबासाहेबांना यांने अभिवादन केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *