राजकारण

वाहुन गेलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना चार लाखाचा धनादेश

वाहुन गेलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना चार लाखाचा धनादेश

नांदेड / नागोराव शिंदे यांची बातमी

गेल्या सप्ताहात अतिवृष्टी होवुन आलेल्या पुरात कोळगाव ता. हदगाव येथिल वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खासदार हेमंतभाऊ पाटिल यांच्या हस्ते चार लाख रूपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला .हदगाव हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवड्या पासुन वारंवार अतिवृष्टी होवुन नाल्यांना पुर येत आहेत, पावसाने थोडी उसंत दिली की शेतकरी सकाळी शेतात फेर फटका मारतात, पाऊस झाला की, वाहते नदि नाले ओलांडावे लागतात.हदगाव तालुक्यातील कोळगाव येथिल शेतकरी परसराम विश्वनाथ क्षीरसागर घराकडे परततांना पुराच्या पाण्यात वाहून गेले होते, त्यांच्या वारस पत्नीकडे चार लाख रूपयाचा धनादेश खासदार हेमंतभाऊ पाटिल यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी आमदार माधवराव जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, तहसीलदार जीवराज डापकर, गावकरी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *