हिमायतनगर येथील परमेश्वर भोयर यांचा मृत्यू चौकशीचे जलद गतीचे आदेश द्यावे-गृहमंत्री दिलीप वळसे साहेबांना आमदारांचे निवेदन.
प्रतिनिधी / एस के चांद यांची रिपोट
हिमायतनगर येथील परमेश्वर बाबुराव भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य मुंबई गृहमंत्री दिलीपजी वळसे-पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून हिमायतनगर येथील परमेश्वर बाबुराव हे दिनांक २०.५.२०२२ रोजी हिमायतनगर लग्न समारंभ करता घरातून बाहेर गेले असतात त्या रात्री उशिरा पर्यंत घरी परत आले नसल्यामुळे शोधाशोध करण्यात आली असताना सुद्धा मिळून आले नव्हते परंतु परमेश्वर बाबुराव भोयर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी जलद गतीने करा आमदार माधवराव पाटील जळगावकर यांची राज्याच्या गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे
हिमायतनगर येथील परमेश्वर बाबुराव सामाजिक कार्यकर्ते यांच्या संशयास्पद मृत्यू ची सखोल चौकशी जलदगतीने करून न्याय मिळवून देण्यासाठी हादगाव विधानसभेचे आमदार राज्याचे गृहमंत्री पाटील जवळगावकर यांनी दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री यांच्याकडे मागणी करून न्याय मिळवून देण्यासाठी संबंधितांना आदेश पारित करावे अशी मागणी केली आहे.
दिनांक २१ मे २०२२ रोजी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर कमानी समोर पोटेकर यांच्या दुकानाच्या पाठीमागे चेंबरच्या टाकीत त्याचा या मृतदेह आढळून आला असल्यामुळे एकच खळबळ उडाली होती ज्या अवस्थेत सापडला त्यावरून खून झाला की काय अशी शंका ग्रामस्थ मंडळींना व नातेवाईकांना आहे सदर प्रकरणी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे फिर्याद दिली असून या प्रकरणाचा तपास संथगतीने होत आहे हिमायत नगर शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून खून दरोड्याच्या घटनातमोठया प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचें वातावरण निर्माण झाले आहे