यवतमाळ/राष्ट्रावादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदुशी
यवतमाळ प्रतिनिधी,:- एस.के.शब्बीर.
या संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्यात प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला संबोधित करताना जयंत पाटील साहेब म्हणाले की, पक्ष आज तुमच्या दारात आला आहे हा एक वेगळा प्रयोग राष्ट्रवादीने केला. मला खात्री आहे की याचा पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. आपण ज्या समस्या उपस्थित केल्या त्याचे निवारण करण्याचा विचार नक्कीच केला जाईल. आपणही आम्हाला ताकद देण्यासाठी प्रयत्न करून पक्षाच्या बुथ कमिट्या प्रभावशाली निर्माण कराव्यात, अशा सुचना त्यांनी दिल्या.
आरक्षणाच्या मुद्यावरून आज काही जण समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण यांच्या भुलथापांना बळी पडू नका. सामाजिक वातावरण खराब करण्याचे काहींचे काम असते, त्याकडे दुर्लक्ष करून आपण एकत्र या प्रश्नाची सोडवणूक करु असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या आढावा बैठकीला पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस महीला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी आ. संदीपभैय्या बाजोरिया, मराठवाडा संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड, चेअरमन शुगर फेडरेशन ऑफ इंडिया जयप्रकाश दांडेगावकर, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, प्रदेश सरचिटणीस नानभाऊ गाडबैल, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर, महीला जिल्हाध्यक्ष सौ सारिकाताई ताजने, यवतमाळ निरीक्षक अशोकभाऊ परळीकर, युवक जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, युवक प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे, युवती जिल्हाध्यक्ष मनीषा काटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे, उमरखेड तालुका अध्यक्ष शंकरराव तालनकर, उमरखेड महिला तालुका अध्यक्ष सौ विशाखाताई जाधव, युवक तालुका अध्यक्ष अविनाश वानखेडे, उमरखेड विद्यार्थी अध्यक्ष आदित्य काळे, महागाव तालुका अध्यक्ष सीताराम ठाकरे, महागाव महिला अध्यक्ष सुरेखाताई नरवाडे, युवक तालुका अध्यक्ष हंसराज मोरे, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील अडकीने, महागाव विद्यार्थी अध्यक्ष दीपक कदम उपस्थित होते.