राजकारण

गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही,

नांदेड हिमायतनगर

नांदेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसून शिवसैनिक हितचिंतक, कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी असतील त्या स्थानिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळावेत आणि सामाजिक उपक्रम राबवून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावेत असे नम्र आवाहन गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले आहे.
गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांचा वाढदिवस ११ सप्टेंबर रोजी असून यानिमित्ताने त्यांनी हितचिंतक स्नेही जणांना आवाहन केले आहे की, संपूर्ण जग मागील सहा महिन्यांपासून भयंकर अश्या कोरोना आजाराचा सामना करत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना वाढदिवस उत्साहात साजरा करणे सामाजिकतेला धरून योग्य होणार नाही त्यामुळे यावर्षी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेतला जाणार नसून वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे आमच्या गोदावरी समूहावर जीव लावणाऱ्या सर्व शिवसैनिक व स्नेही जणांनी तुम्ही आहात त्याच स्थानिक ठिकाणी सामाजिक सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून सामाजिक उपक्रम राबवावेत जेणे करुन त्याचा समाजाला फायदा होईल, हार तुरे, बॅनर यावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा गरजूंना उपयोगी साहित्य देऊन सामाजिक कार्याचा आदर्श द्यावा, सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून आपले सामाजिक कार्यात मोलाचे योगदान म्हणून सामाजिक अंतर पाळून रक्तदान शिबिरे घेतल्यास त्याचा नक्कीच समाजाला फायदा होईल. तसेच ज्या भागात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येतील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवावा आणि प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यास न येता भ्रमणध्वनीद्वारे व सोशल मीडिया द्वारे आपण दिलेल्या शुभेच्छा संदेशांचा आदरपूर्वक स्वीकार करण्यात येईल अशी नम्र विनंती राजश्री पाटील यांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *