व्यंकय्या नायडू यांचे बॅनर जाळले
ढाणकी शहर प्रतिनिधी ( उमरखेड 25 जुलै ) :
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा खासदार यांच्या शपथविधी सोहळा दरम्यान केलेल्या चुकीचे विधानाचा निषेध करत जिजाऊ ब्रिगेड व पुरोगामी युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती चौक उमरखेड येथे आंदोलन करत वेंकैया नायडू यांचे बॅनर जाळले.
“इट्स माय चेंबर, इट्स नॉट यूअर हाऊस ” म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथेनंतर दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेला विरोध करणाऱ्या तसेच
देशाच्या उच्च पदावर असलेल्या नायडूंचा शिवरायांच्या जयघोषाला आक्षेप घेण्याच्या मूर्खपणामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीतर अखंड हिंदुस्थान चे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान असून व्यंकय्या नायडू यांनी ताबडतोब याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोज ताई देशमुख , पुरोगामी युवा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे , रेखाताई भुते, सागर शेरे, रत्नदीप धुळध्वज, सागर ताई शिंदे, सपनाताई चौधरी , ज्ञानेश्वर लोखंडे, प्रशांत रुडे, विश्वजीत गवळे, नितेश राठोड, मुसब्बीर अली, सुरज काळे व शाहरुख पठाण आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते