सिरपली ते गांजेगाव रस्ता मजबुतीकरणाचे काम मार्गी लागणार माजी सरपंच राजु पाटील
नांदेड हिमायतनगर
नागोराव शिंदे
तालुक्यातील मौजे सिरपली ते गांजेगाव रस्त्यावर मजबुतीकरण करणयाचे काम मार्गी लागणार असल्याचे माजी सरपंच राजु पाटील यांनी सांगितले आहे ,सवीस्तर असे कि
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांची आज नांदेड येथे त्यांच्या निवासस्थानी सिरपली शैलोडा गट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.सरपंच श्री राजू पाटील भोयर श्री गणेशराव पाटील एकंबेकर व ग्रामसेवक श्री नारायण काळे उपस्तीत श्री राजू पाटील आणि गणेशराव पाटील यांनी सिरपली ते पैनगंगा नदी पुलापर्यंत रस्ता प्रश्न मांडला हा रस्ता झाला तर सिरपली ,सेलोडचे,व एकंब,सिरंजनी, येथील नागरिकांना विदर्भाला जोडणारा हा रस्ता झाला तर मराठवाडा विदर्भ ये-जा करण्यासाठी सोयीचा होईल हि बाब खा हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून देतात तर खा हेमंत पाटील यांनी गेलेल्या शिष्टमंडळाला वरील रस्ता मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मजबुतीकरण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले असल्याचे राजु पाटील यांनी सांगितले आहे