हिमायतनगर शहरात अवैध देशी दारूसह मटका तेजित
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष… युवा पिढी व्यसनाधिनतेकडे
हिमायतनगर (प्रतिनिधि)शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थानचा यात्रा मोहत्सव दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा होतो पण ह्या वर्षी परमेश्वर मंदिर परिसरात अवैध देशी दारू विक्री व मटका जुगाराचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत ह्या बाबी कडे स्थानिक पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मागील काही दिवसा पूर्वी मा.तहसीलदार यांना मिर्झा सरफराज बेग यांनी एका निवेदना नुसार तक्रार सुद्धा केलि होती
याबाबत सविस्तर व्रत असे की जिल्ह्यातील माळेगांव यात्रे च्या नंतर सर्वात मोठी यात्रा म्हणुन श्री परमेश्वर मंदिर देवस्थानची यात्रा परिचित आहे त्याच परमेश्वर मंदिर परिसरात अनेक कित्येक दिवसा पासुन अवैध देशी दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे या देशी दारू च्या आहारी लहान बालके व रोज मंजूरी करणारे कामगार सुद्धा गेलेले दिसत आहेत व त्यामुळे शहरात भांडण तंट्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे यात्रेमध्ये येणाऱ्या महिला मूली मध्ये दारुद्या व टवाळखोर मुलांच्या अति वावरा मुळे भितीचे वातावरण पसरले आहे शहरात खुलेआम देशी दारू विक्री चालु असून सुद्धा पोलिस कर्मचारी गप्प का ? असा सवाल गावातिल सुजान नागरिक व तक्रारदार मिर्झा सरफराज करत आहेत दारुच्या व्यसनामुळे गावातील अनेक संसार उध्वस्त होत आहेत ही परिस्थिति राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती असून सुद्धा त्यांच्या मिलीभगतिमुळे शहरासह तालुक्यातील इतर ठिकांनच्या अवैध धंद्याकडे त्यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोलके चित्र सदया हिमायतनगरात दिसून येत आहे राजरोसपणे देशी दारू विक्री करणाऱ्यावर नूतन जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर व पोलिस अधिक्षक महेश मगर यांनी तात्काळ या बाबी कडे लक्ष केंद्रित करुण शहरा सह तालुक्यात सुरु असलेल्या देशी दारू विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करावि अशी मागणी अनेक दिवसा पासुन होत आहे त्यामुळे आता तरी ह्यांच्या वर कार्यवाही होईल का ? व अनेकांचे संसार उध्वस्त होन्या पासून वाचतील का असा सवाल सुजान नागरिक विचारत आहेत
चौकट
मागील काही दिवसा पूर्वी हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माधवराव पाटिल यांनी तहसील कार्यालय येथील आयोजित पाणी पुरवठा बैठकी मध्ये नागरिकांच्या तक्रारिस मान देऊन आमदार साहेबांनि उपजिल्हाअधिकारी, तहसीलदार , यांच्या समोर स्थानिक पोलिस निरीक्षक यांना असे सांगितले होते की शहरात जे काही अवैधधंदे सुरु आहेत ते मी चालु देणार नाही त्यासाठी तुम्ही ते लवकरात लवकर बंद करा असे आदेश दिले होते तरी पण हे बंद ण झाल्यामुळे आमदारांच्या आदेशाचे सुद्धा प्रशासना कडून पालन होत नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल सुजान नागरिकांमधून बोलून दाखवला जात आहे,
प्रतिनिधी, शेख चांद हिमायतनगर