ताज्या घडामोडी

उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी.

उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी.

(ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे)

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागांची जीवनदायिनी असणारे पैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ऐन हिवाळ्यात गेल्या १५ दिवसापासून ठिक- ठिकाणी कोरडे पडल्यामुळे उमरखेड, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील (हरभरा, गहू, हळद, ऊस, इ.) चारा पिके सुध्दा पाण्यावाचून सुकत आहेत.

 

तसेच उन्हाळ्यात सुध्दा शेतकऱ्यांना, जणावरांना, नागरीकांना व शेतीपिकाला तिवृ पाणी टंचाई होत असते.

 

पावसाळ्यामध्ये धरणाचे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीत सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्चुन खरीब हंगामाचे नुकसान होते. त्या बदल्यात शासनाकडून तुटपुंजी मदत देवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात.

 

अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रिय किसान मोर्चा चे राज्य कार्याध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर तथा भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय महासचिव विद्वान केवटे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 23 डिसेंबर रोजी उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी ऍड.शिवाजीराव वानखेडे, दिपक चंद्रवंशी, बाजीराव गायकवाड, दशरथ पतंगे, चांदराव सूरोसे,मल्हारी दवणे, बापूराव वाठोरे, अक्षय सूर्य,पांडुरंग कदम यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *