हिमायतनगर तालुक्यातील डोलारी येथे घराचे बांधकाम करणाऱ्या दोन मिस्त्री चा अपघाती मृत्यू
( नांदेड हिमायतनगर )
नागोराव शिंदे ::::::::::::::::::::
हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील दिलीप राऊत यांच्या घराचे बांधकाम करताना ढाणकी तालुका उमरखेड येथील दोन कामगार मित्रांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे
सविस्तर वृत्त असे की नेहमीप्रमाणे हे मिस्तरी कामगार सलाप वरचे गजाळी कापण्याचे काम करत असताना अचानक गझनीचा तोल गेल्याने गजाळी एल एन के वि लाईट सप्लाई च्या तारा वर जाऊन पडल्याने त्यांचा हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचारास नांदेड येथे रेफर दिला असता नांदेड येथे मध्ये रस्त्यात मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मिळाली आहे
यामध्ये फिरोज खा अहमिद खा वय वर्षे अंदाजीत तीस वर्षीय त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे,
शेख खदीर शेख इब्राहिम यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा यांचा परिवार आहे, रोजंदारीवर काम करणाऱ्या या दोन मिस्तरी यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,
प्रतिनिधी :- नागोराव शिंदे