ताज्या घडामोडी देश-विदेश राजकारण

विधानसभा मतदारसंघात माधवराव पाटील यांची लोकप्रियता व कार्यतत्परता पाहता पुन्हा एकदा माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज दिनांक 4 / 10 /2019

BIG BREKING
_____
Tv9 माझा LIVE NEWS

दि.4/10/2019
______
अखेर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब. उमेदवारी दाखल हदगाव इथे दाखल करण्यात आली.
हदगाव /हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू होती चाभरेकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी माजी खासदार राजीव सातव यांनी प्रयत्नांची पराकाष्टा चालवली होती परंतु नांदेड जिल्ह्यातील चव्हाणांचे वजन पाहता पक्षश्रेष्ठींनी राजीव सातव यांचा अठ्ठहास दूर करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शब्दाला प्रमाण मानून जवळगावकर यांच्या नावाला संमती दर्शविली.
चाभरेकर व जवळगावकर यांच्यात मध्यस्थीनंतर उमेदवारीचा वाद मिटला असून चाभरेकरांची समजूत काढण्यात अशोकरावांची यशस्वी शिष्टाई कामाला आली.

हदगाव/ हिमायतनगर

विधानसभा मतदारसंघात माधवराव पाटील यांची लोकप्रियता व कार्यतत्परता पाहता पुन्हा एकदा माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज दिनांक 4 / 10 /2019 रोजी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हदगाव येथे नामांकन दाखल करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन करून हदगाव /हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *