ढाणकी शहरात भीम जयंती उत्साहात साजरी; भीम सैनिकांच्या शिस्तीचे ठाणेदारांकडून कौतुक.
ढाणकी (प्रतिनिधी): येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. दरवर्षी १४ एप्रिल रोजी निघणारी मिरवणूक यावर्षी १५ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. या सोहळ्यात हजारो भीम सैनिकांनी सहभाग नोंदवत ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पारंपारिक वाद्ये आणि बॅन्जो पथक होते. बॅन्जोच्या तालावर भीम सैनिक मोठ्या उत्साहात न्हाऊन निघाले होते. शहरात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी इतर समाज बांधवांनीही या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे धानकी शहरात जातीय सलोख्याचे दर्शन घडले. या मिरवणुकीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे (API) आणि API दानडे यांच्या नेतृत्वाखाली तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
PSI सागर अन्नमवार, PSI गजानन कनाके, रवी गिते, दत्ता हिंगाडे, मोहन चाटे, राहुल कोकरे, संतोष चव्हाण, प्रकाश मुंढे, हिम्मत जाधव,राजू बेलेवार, प्रवीण जाधव, सुदर्शन जाधव आणि पोलीस स्टेशनचे १६ अंमलदार.
अतिरिक्त कुमक: SRPF ची १ कंपनी (१ अधिकारी व ३२ जवान), स्ट्रायकिंग फोर्सचे १ अधिकारी व ५ अंमलदार आणि गृह रक्षक दलाचे (Home Guard) ३२ जवान तैनात होते.
ठाणेदारांकडून भीम सैनिकांचे कौतुक हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर असतानाही जयंती उत्सव अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. भीम सैनिकांनी दाखवलेला संयम आणि पोलीस प्रशासनाला केलेले सहकार्य पाहून ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी भीम सैनिकांचे जाहीर कौतुक केले. या शिस्तीमुळेच धानकीत शांतता व सुव्यवस्थेचा आदर्श निर्माण झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.




