कारखेड फाटा येथे १०व्या सम्राट अशोक बौध्द धम्म परिषदेचे आयोजन.
उमरखेड / प्रतिनिधी / मिलिंद चिकाटे : गेल्या दहा वर्षा पासून ग्रामीण भागामध्ये मानवी कल्याण्याचे विचार पेरण्याचे सातत्याने कार्य करणाऱ्या नालंदा बहुउदेशीय संस्थेच्या वतीने कारखेड फाटा येथे १० व्या सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दि १ मार्च रोजी करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे तर स्वागताध्यक्ष साहेबराव कांबळे हे असून या वेळी आंबेडकरी मिशन च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देणारे दिपक कदम नांदेड यांना, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक रत्न तर देश विदेश्यात आपल्या साहित्याव्दारे आंबेडकरी विचारची पेरणी करणारे प्रख्यात साहित्यिक, विचारवंत प्रोफेसर डॉ अनिल काळबांडे यांना, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉ भास्कर दवणे यांनी दिली . सकाळ च्या सत्रात भदन्त पय्याबोधी थेरो व उपस्थीत भिक्षू संघाच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहण व धम्म देशना होईल . दुपारच्या व्याख्यानमाला सत्रात ‘संविधान ‘ या विषयावर प्रबोधनकार डॉ भास्कर दवणे , डॉ अनिल काळबांडे , डॉ प्रेम हनवते, प्रा व्ही एम कांबळे, गुलाबराव दवणे , ज्ञानेश्वर धोंगडे यांचे प्रबोधन होईल . रात्रीला वैचारिक गितांचा सामना शाहीर देवानंद जगताप व दिपाली कांबळे यांचा होईल . या धम्मपरिषदेचे आयोजन सुधाकर कांबळे , संयोजक सुनिल कवडे , सचिव चंपतराव विणकर, धोंडबाराव विनायत , संघटक सुरेश दवणे व सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.



