राजकारण

यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड.

यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड.

 

यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.

 

३० ऑगस्ट २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा युवा जिल्हाध्यक्षपदी पुसद तालुक्यातील बोरी येथील वजाहत अली खान उर्फ अंजुम लाला यांची निवड करण्यात आली.अंजुम लाला यांनी पक्षप्रवेशाच्या वेळीच दोन नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह AIMIM मध्ये प्रवेश केला होता.

महागाव तालुक्यातील बोरी येथील युवा कार्यकर्ते यांचा नुकताच एआयएमआयएम पक्ष प्रवेश प्रभावी ठरला आहे. अंजुम लाला यांच्या प्रवेशामुळे पक्षामध्ये त्यांचा प्रभाव अधिक वाढला असून आहे. त्यांची ही नियुक्ती आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पुसदच्या राजकारणाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.अंजुम लाला यांची तरुणांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे न – केवळ एआयएमआयएमचा पाया जिल्ह्यात भक्कम होणार नाही, तर पुसद मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडी प्रसंगी यवतमाळ उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष मोहम्मद सलीम शाह सागवान, यवतमाळ जिल्हा संघटक कृष्णा पुंजाराम जाधव, पुसद शहर अध्यक्ष अमजद खान तसेच आजी-माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *