ताज्या घडामोडी

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक कोंडी,लोकांच्या सुरक्षितता”धोक्यात “

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक कोंडी,लोकांच्या सुरक्षितता”धोक्यात “

 

नियमांचे उल्लंघन होत असूनसुद्धा प्रशासनाची बघ्याची भूमिका!

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

 

 

बाळासाहेब ठाकरे चौक ते संविधान चौक पर्यंत ड्रेन चे काम चालू असून ड्रेन झालेल्या ठिकाणची काढलेली काळी माती तशीच रस्त्यावर टाकल्यामुळे पाण्याने चिकल होत असल्याने नागरिक वहाने रोड वर लावत आहे, तर काही ठिकाणी ड्रेन वर दुकाने थाटून आपले दुकान रोड पर्यंत आणल्यामुळे मैन चौकात वाहतूक कोंडी करत आहे यावर ना बांधकाम विभाग व नगरपंचायत ना? पोलीस प्रशासन लक्ष देत आहे, वाहतूक कोंडीमुळे लोकांना गैरसोय होऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडी करणे, ही एक गंभीर समस्या असून लोकांना त्यांच्या नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचायला अडचणी येत आहे तर इतर वाहनचालकांना गाड्या चालवताना अडचणी येत आहे.

 

भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करणे किंवा थांबवणे हे नियमांचे उल्लंघन असून सुद्धा पोलीस प्रशासन यावर कार्यवाही करताना दिसत नाही.यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या सुरक्षितता”धोक्यात आली आहे”

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *