ताज्या घडामोडी

बंदी भागातील गावांना जोडणाऱ्या आठरी पुलाची उंची कधी वाढणार ?

बंदी भागातील गावांना जोडणाऱ्या आठरी पुलाची उंची कधी वाढणार ?

[पुलावरून वाहत जाणाऱ्या पावसात, वाहून जाण्याची तर वाट पहिली जात नाही ना?]

 

ढाणकी / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे :

 

उमरखेड तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले पैनगंगा अभ्यारण्य. अभ्यारण्यात असलेले मोठ मोठे वृक्ष, पक्षी प्राणी यांसह पैनगंगा नदी वर असलेला सहस्त्रकुंड येथील धबधबा पाहण्यास दूरदूरुन पर्यटक पावसाळ्यात येत असतात. मात्र सहत्रकुंड आणि जंगल भागात जाण्यासाठी पर्यटकाला आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते.

सहस्त्रकुंड व पैनगंगा अभयारण्याला भेट देण्या करीता ढाणकी येथून जावे लागते. ढाणकी ते पैनगंगा अभयारण्याच्या मध्ये ढाणकी शहरालगत आठरी नाला आहे. या नाल्यावरील पूल अतिशय लहान असल्याने, थोडे जरी पावसाचे थेंब आले तरी या नाल्या वरून पाणी वाहत असते. नाल्यावरील पाणी उतरण्याशिवाय दळणवळणास पर्याय नसतो. त्यामुळे नाल्याला पाणी वाढले की दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळत असतात.

बंदी भागातील गावकऱ्यांना तालुक्याला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने, त्यांना पावसाळ्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बंदी भागातील नागरिक आठरी नाल्यावरील पूल उंच करण्याची मागणी करत असतात. परंतु त्यांच्या मागणीकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देते, ना शासन.

बंदी भागातील नागरिकांना पुलाची उंची वाढून देण्याचे आश्वासन आज पर्यंतच्या आजी, माजी आमदाराने दिले. परंतु त्यांचे आश्वासन काही प्रत्यक्ष्यात उतरले नाही.

बंदी भागात राहणाऱ्या गावच्या रहिवाश्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर ढाणकी, उमरखेड शिवाय पर्याय नाही. अनेक गरोदर महिला, गंभीर बिमार रुग्णाला घेऊन नातेवाईक, मित्र मंडळी आपला व रुग्णाचा जीव मुठीत घालून आठरी पूल पार करून, रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात.यावर्षी सुद्धा या पुलाकडे बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळणार. बंदी भागातील नागरिकाला ढाणकी येथील बस स्टॅन्ड वर आपला मुक्काम पुलावरील पाणी उत्तरे पर्यंत करावा लागणार हे मात्र निश्चित. बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार पुलाच्या पाण्यात वाहून जाण्याची तर वाट पाहत नाही ना ? असा प्रश्न बंदी भागातील गावकरी, नाल्या पलीकडील शेतकरी करत आहेत.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *