ताज्या घडामोडी

मनसे चे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मानले. पोलीस उपमहानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार…!

मनसे चे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मानले. पोलीस उपमहानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार…!

 

किनवट माहूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींनी जास्तीत जास्त रोजगार मेळाव्यात. नोंदणी करून घ्या.

 

मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांचे आवाहन

 

श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून किनवट माहूर येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून दिनांक.09/0520025 रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

किनवट येथे रोजगार मेळावा आयोजित करून अती दुर्गम डोंगराने ग्रेसलेल्या भागातील गरजू सुशिक्षितांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची संधी किनवट येथील रोजगार मेळावा आयोजनातून उपलब्ध करण्यात आल्याने ग्रह खात्यांमार्फत किनवट माहूरच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान ग्रह खात्यामार्फत केल्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळणार हे विचार करून दोन्हीही तालुक्यातील सुशिक्षित वर्गात आनंदमय वातावरण तयार झाले आहे.

 

किनवट माहूर तालुका हे अति दुर्गम नक्षल ग्रस्त डोंगराळ भागाने ग्रासला असून ,तेलंगाना सीमा लगत महाराष्ट्रा चा शेवटचा टोक म्हणून ओळखला जातो. येथील 60 ते 70 टक्के लोकांचा शेतीवर उदरनिर्वाह होत असल्यामुळे उर्वरित 30 टक्के नागरिकांचा जंगलातील तेंदू पत्ता, तोडणे.मोह फुल वेचणे, झाडांचे गोंद काढण, पळसाच्या झाडांच्या पानाचे पत्रवळी तयार करून बाजारपेठेत विक्री करून हे त्रिमाई उत्पन्न घेत असतात.व काही लोक तेलंगानात कामाचा शोधात मोलमजुरी करिता स्थलांतर करत असतात.उर्वरित काही महिने स्थानिक शेती काम करून मोलमजुरी करत राब राब राबतात व आपल्या मुला व मुलींना काबाडकष्ट करून उच्चशिक्षित शिक्षण देऊन सुद्धा शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या पद्धतीने नांदेड येथे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांनी व पोलीस उपमहा निरक्षक साहेबांनी नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि विश्वासाने काम करून घेण्याची आदरणीय एसपी साहेबांची कार्यपद्धतीतून सर्वच सुशिक्षित बेरोजगारांना 3 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे

” मिशन उडान ” या लक्षवेधी अभियानांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा घेतला या मेळाव्यात साधारणता 11000 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल असं नियोजन केले वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांना आमंत्रित केल्याने पहिल्या सत्रात

35 00 बेरोजगार नौकरी मिळाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आनंदही होता त्याच पद्धतीने मिशन उडान चा दुसरा टप्पा म्हणून किनवट माहूर येथील अति दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध देण्याकरिता म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब व पोलीस

उपमहानिरीक्षक साहेबांनी दुसरा टप्पा म्हणून ग्रामीण भागातून टप्पा दोन ची सुरुवात एक किनवट येते रोजगार मेळावा आयोजित करून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी माननीय पोलीस उपमानी रक्षक साहेब व मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांच्याकडे केली होती.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *