ताज्या घडामोडी

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या शेतात जाऊन घेतला विषाचा घोट.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या शेतात जाऊन घेतला विषाचा घोट.

 

पुसद : गोपाल राठोड यांची बातमी

 

सेवानगर वडद येथील घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात जात विषाचा घोट घेतला. त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना १० मार्चला सकाळी तालुक्यातील सेवानगर वडद येथे घडली.

 

शंकर नंदू पवार (४६) रा. सेवादासनगर वडद असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.तो वडीलोपार्जित शेती कसून कुटुंबाचा गाढा ओढायचा. गेल्या काही वर्षात त्याला सतत नापिकी झाली. त्यातून त्याच्या शिरावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो विमनस्क रहायचा. अखेर त्याने १० मार्चला सकाळी टोकाचे पाऊल उचलत शेत गाठले. तसेच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगात विष भिनताच त्याची प्रकृती चिंताजनक झाली. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी तत्काळ त्याला उपचारासाठी पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमीक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र १९ मार्चला सकाळी उपचाराला प्रतिसाद न देता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली होती.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *