माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:- गणेश राठोड,, शेकापूर.
आष्टा, उमरा, हिवळणी, पापळवाडी,सह लगतच्या परिसरात शेतातील जनावरांच्या गोट्यासह कच्च्या घराची पडझड. माहूर तालुक्यात दिनांक आठ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते.तर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळनी, पापळवाडी, सह लगतच्या परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह,तुरळक गारपीट झाल्याने, शेतातील उभ्या पिकाचे त्यात मुख्य म्हणजे तीळ पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती असून, यामधील शेतातील बांधलेले कच्चे जनावरांचे गोठे, आणि कच्च्या घरांचे टीनपत्रे उडून ताटवाच्या बांधलेल्या भिंती पडल्याची माहिती मिळत आहे. रात्री जोरदार वादळी वारे सह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिक एकमेकांना सावधानीचा इशारा देताना दिसत होते. तर दुसरीकडे शेतशिवरातील गोठ्यात बांधलेले जनावरे आणि जागलिसाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी दिला आहे.
माहूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण सह वादळी वारे आणि तुरक पाऊस पडल्याच्या घटना घडत असून, दिनांक 8 रोजी मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आष्टा, हिवाळीनी, पापलवाडी, उमरा, या गावाशेजारील शेत वाड्यात प्रचंड वादळवाऱ्यासह गारपीट झाल्याने, तीळ पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक शेतात बांधलेल्या गोठ्यावरील टीन पत्रे आणि घरावरील इतर साहित्य उडून गेले. ताटव्याने बांधलेल्या कच्च्या घरांची अतिप्रमाणात नास धूस झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि गारपीटीची शक्यता असल्याने, महसूल प्रशासनाकडून सुद्धा सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
सदरील वादळी वाऱ्याने गारपीटीत जीवित हानी झाल्याची घटना घडली नसली तरीही ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे रात्रभरात गारपीट होऊन नागरिकासह गोठ्यात बांधलेल्या जनावरांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड.. यांनी दिला आहे..




