tv9माझा लाईव्ह न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीचा दणका माहूर नगरपंचायतीने घेतली दखल.
दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन
प्रतिनिधी गणेश राठोड.
माहूर : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी केली कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याची पाहणी….
दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन…..
श्रीक्षेत्र माहूर शहरासह श्री रेणुका माता मंदिरावर पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात साठवलेले पाणी वाहून जात असल्याने, नगराध्यक्ष फिरोज भाई दोसांनी, मुख्याधिकारी विवेक कांदे, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, कार्यालय अध्यक्ष वैजनाथ स्वामी, यांचे सह नगरसेवकांनी पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर जाऊन कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पाण्याची पाहणी केली. नदीपात्रात सुरू असलेल्या मोठ्या बंदराच्या कंत्राटदराच्या प्रतिनिधींना बोलावून कोल्हापुरी बंधाऱ्यात मातीचा बांध टाकून पाणी अडविण्याचे कंत्राटदार प्रतिनिधी यांनी दोन दिवसात संपूर्ण बंधाऱ्यात पाणी आणून देण्याचे आश्वासन दिले असून, माहूरच्या पाणीपुरवठा प्रति नगरपंचायत सज्ज असल्याने त्यांचे माहूरकरासह भाविकातून अभिनंदन होत आहे.
सदरील बंधाऱ्यात पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी राहिल्याने, माहूरकराची व देवस्थानांची चिंता वाढली होती. ही बाब एकमत आणि टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज च्या प्रतिनिधीना कळताच, त्याबाबतची बातमी प्रकाशित केली होती. सदरील बातमीची तात्काळ दखल घेऊन नगरपंचायत चे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी थेट बंधारा गाठून कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना पाणी आडविण्याचे सूचना दिल्या यावेळी बंधाऱ्यावर पाणीपुरवठा सभापतीचे प्रतिनिधी रणधीर पाटील, बांधकाम सभापती प्रतिनिधी रफिक सौदागर, नगरसेविका प्रतिनिधी इरफान भाई, अफसर भाई, देविदास सिद्धांत, अभियंता विशाल ढोरे, स्वच्छता विभागाचे गणेश जाधव, व इतर उपस्थित होते.
माहूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकमेव नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा असून, येथे आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून नवीन मोठ्या बंधाऱ्याचे काम शारदा कंट्रक्शन कडून जलद गतीने करण्यात येत असले, तरीही बंधाऱ्यातील पाणी त्यांना ड्रायव्हर करून दुसरीकडून काढावे लागले. आता मात्र नदीपात्रातील पाण्याची धार कमी झाल्याने, कोल्हापुरी बंधाऱ्यात अर्ध्यावरच माती टाकून पाणी थांबविल्याने पाणी साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे माहूरकरांची चिंता वाढली होती. मात्र नगरपंचायत माहूर या प्रकरणी तात्काळ दखल घेत पाहणी केल्याने आता संपूर्ण कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी थांबणार असल्याने पाण्याची चिंता मिटणार आहे. त्यामुळे माहूरकरा सह भाविकातून नगरपंचायत चे पदाधिकारी आणि अधिकाऱ्याचे अभिनंदन होत आहे…




