उमरखेड / मोरचंडी या गावात शिक्षण अधिकारांच्या दालनातच विद्यार्थ्यांनी भरविली शाळा!
मुख्यसंपादक / एस.के. चांद यांची बातमी
शिक्षणाधिकारी साहेब आम्हाला शिक्षक द्या.शाळा वाचवा,शिक्षण वाचवा,गरिबाला शिकू द्या ह्या घोषणांनी आज पंचायत समिती परिसर दुमदुमला.
उमरखेड तालुक्यातील बंदी भागाच्या मोरचंडी या गावामध्ये 244 पेक्षा जास्त पटसंख्या असताना केवळ दोन शिक्षकांवरती शाळेचा कार्यभार चालविला जातो.यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.शालेय शिक्षण नियमानुसार पतटसंख्येनुसार किमान आठ शिक्षक असायला हवेत.पण वारंवार मागणी करून देखील या बद्दल प्रशासनाने उसलदासिन भूमिका घेतली.त्यामुळे आम्हाला तात्काळ पटसंख्ये प्रमाने पर्याप्त शिक्षक उपलब्ध करून द्या.
ह्या मागणीसाठी तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील मोरचंडी या गावातील विद्यार्थी,पालक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी दि .07 ऑगस्ट रोजी उमरखेड येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडकले.
भारतीय संविधानाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला असताना.आज स्वातंत्र्याच्या पंचेहत्तरी नंतर देखील विद्यार्थ्यांना आम्हाला शाळा शिकवायला शिक्षक द्या.अशी मागणी करावी लागत आहे.ही फार मोठी शोकांतिका आहे.म्हणून शिक्षण विभागाने तात्काळ ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात असे प्रतिपादन या मोर्चाचे नेतृत्व करताना भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव,विद्वान केवटे यांनी केले.
यावेळी आम्हाला शाळेत शिक्षकच नसल्यामुळे आम्ही शाळेत जाण्यापेक्षा शिक्षण विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती.त्यानुसार कार्यालयाच्या समोरच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,प्रतिज्ञा तथा संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून याच ठिकाणी वर्ग भरविला आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान विद्यार्थी व पालक शिक्षण विभाग कार्यालयावर धडकल्यानंतरगट शिक्षणाधिकारी साहेबांनी या मागणीची गंभीरपणे दखल घेत दोन शिक्षकांची लिखित ऑर्डर काढून एक ऑर्डर दुसऱ्या दिवशी काढण्यात येईल.असे आश्वासन दिले.
यावेळी या संदर्भात आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गाडेकर,गावातील इतर जबाबदार पालक वर्ग,विद्यार्थी यांनी आपली भूमिका मांडून आपल्या शाळेविषयी भावना व्यक्त केल्या.
यावेळी मोठ्या संख्येने पाहिले ते सातवी ह्या इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनी,पालक वर्ग उपस्थित होते.
ह्या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ह्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.




