महागाव शहरामध्ये विजेचा लपंडाव पावसाळा सुरू झाला तरी सुरूच आहे. याचा त्रास नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. दरम्यान काही ठिकाणी महावितरण केबलला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. महागाव शहरामध्ये महावितरणाच्या भरणीय मानाचे संकट नसले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. मागील काही महिन्यापासून महागाव परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री अपराती बत्ती गुल होत असल्याने एन पावसाळ्यात नागरिकांचे बेदम हाल होत आहेत. महागाव शहरामध्ये किमान चार ते पाच वेळा दिवसांमधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होत असून महावितरणाच्या कारभाराबाबत नागरिकाकडून संताप व्यक्त होत आहे. वीज पुरवठा खंडित झाला की तब्बल दहा ते बारा तासांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे. महावितरणाकडून वेळी अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे . तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित संगणीय खाजगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत. अशावेळी विजेचा लपंडाव होत असल्याने संगणक व इतर वस्तूंमध्ये क्रांती बिघाडाच्या शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पावसाळ्याच्या विजेच्या खेळीचा फटका घरगुती विद्युत उपकरणादेखील बसत आहे.
*महावितरणाचे कर्मचारी सुद्धा थकले.*
ज्या ठिकाणी तांत्रिक बिघाड आहे त्या ठिकाणी दुरुस्ती केली की काही मिनिटात स्पार्क होऊन पुन्हा बत्ती गुल होत आहे आणि हा प्रकार सातत्याने सुरू आहे . सततच्या बत्ती गुल मुळे नागरिकांच्या इन्वर्टर व खरेदीवर नागरिकांचा जोर वाढला आहे. विज नाही म्हणून पाणी नाही, घरोघरी होणारा पाणीपुरवठा हा विजेवर अवलंबून असल्यामुळे विज असेल तरच पाणी असते. पाणी येण्याची वेळ झाली की नेमकी बत्ती गुल होते. याचा फटका महिलांच्या दैनंदिन कामकाजावर होऊ लागला आहे. रोज वीज वितरण




