४० डिग्री च्या उकाड्यात ढाणकीत तब्बल सहा तास वीज गुल.
[दोन दिवसात तीन-तीन तास मेंटेनन्स चे काम का केले नसावे महावितरणने ?]
ढाणकी । प्रतिनीधी :
मिलिंद चिकटे
उष्णतेच्या भयंकर लाटेमुळे सद्यस्थितीत मानव, प्राणी, पशुपक्षी भयानक त्रासलेले असून ४० डिग्री सेल्सीअस तापमान सद्यस्थितीत आहे.
या भयंकर ४० डिग्रीच्या उकाड्यात ढाणकीकरांना मात्र तब्बल सहा तास विजेविना , लहान मुला बाळांना घेऊन घराच्या बाहेर झाडांच्या आसऱ्यात काढावे लागले.
पावसाळ्यापूर्वीच्या मेंटनन्सच्या कामासाठी लाईन ६ तास बंद ठेवण्यात आल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
एवढ्या भयंकर महा उकाड्यात मेंटनन्सच्या कामासाठी दिवसा तब्बल सहा तास लाईन बंद ठेवून, वीज ग्राहकांना नागरिकांना हा नाहक त्रास नव्हे का ?
मेंटनन्सस चे काम करणे गरजेचे आहे परंतु, पावसाळ्यात लाईनचा पुन्हा त्रास होणार नाही याची खात्री मेंटेनन्स करणारा ठेकेदार वीज ग्राहकांना देणार का ?
एवढ्या भयंकर उकाड्यात सहा तासाऐवजी दोन दिवसात तीन तीन तास मेंटनस चे काम केले असते तर, सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचला असता. एवढं साधं गणित महावितरण च्या अधिकाऱ्यांना कळू नये का ?
ठेकेदाराचे दोन दिवसाचे मजुरीचे पैसे वाचावे याकरिता, एकाच दिवसात सर्व काम करण्याचा हा अट्टाहास तर नाही ना ? मग वीज ग्राहकांना / सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास झाला तरी, त्याचं काही घेणं देणं महावितरण ला नाही का ?
दिनांक १५ एप्रिल रोजी ढाणकी शहरात सकाळी साडेआठ वाजता मेंटेनन्स चे काम करण्याकरिता गेलेली लाईन ही दुपारी तब्बल अडीच वाजता आली. त्या अनुषंगाने महावितरण वर शहरातील नागरिक रोष व्यक्त करताना दिसून आले व वरील प्रश्न उपस्थित करताना दिसले.
विज बिल वसुलीसाठी तत्पर असणारे महावितरण , वीज ग्राहकांना सुरळीत वीजसेवा देण्याकरिता पुढे येऊन, मेंटेनन्सच्या कामाकरिता भर उन्हाळ्यात सहा सहा तास लाईन बंद ठेवण्याऐवजी, काम डिव्हाइड करून नागरिकांना भविष्यात त्रास होणार नाही.
असं नियोजन करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



