घनकचरा निविदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, नगरपंचायत पद कर्मचाऱ्यांच्या जागी बेकायदेशीर वापर !
मुख्याधिकाऱ्याविरोधात नगरसेवकाची तक्रार ; ढाणकी येथील प्रकार.
ढाणकी । प्रतिनिधी :
मिलिंद चिकाटे.
ढाणकी नगरपंचायत मार्फत घनकचरा निवेदिता काढून, विशिष्ट कंत्राटदार राजवीर पाटील नांदेड निवेदिता मंजूर करून, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकामी, कंत्राटी पद्धतीने त्यांनी गावातील म्हणजेच ढाणकी नगरपंचायत हद्दीतील व्यक्तीची घनकचरा उचलण्यात आणि तसेच विल्हेवाट लावण्याकामी भरती करून घेतली. परंतु एकूण नियुक्त केलेल्या भरतीतील मनुष्यबळाची संख्या ही माहितीप्रमाणे ३३ आहे. परंतु त्यातील ०३ कंत्राटी कर्मचारी हे सतत गैरहजर राहतात व उर्वरित ३० कर्मचाऱ्यापैकी शासकीय पदस्थापनेच्या जागी , कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या ८ कर्मचाऱ्यांची , कोणतीही शासन पद भरतीविना बेकायदेशीरपणे, घनकचरा कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कंत्राटी कामाऐवजी उपयोग करून, शासनाकडून शासकीय पदांचा भरणा न करता, काही विशिष्ट पदाचा येणारा शासन निधी हा, विना नियुक्त व्यक्तींच्या नावाने शासनाची फसवणूक करून, मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी हे शासनाकडून मानधन लाटत आहेत. तसेच त्यांच्या या गैर कायदेशीर व बेकायदेशीर कृत्यामुळे नगरपंचायत हद्दीतील आवश्यक ती कामे तसेच घनकचरा उचलणे व इतर आवश्यक ती कंत्राटी पद्धतीने निविदेतील कामे खोळंबून पडलेली असल्याने, त्यांच्याविरुद्ध योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक परमेश्वर गंभीर निम्मलवाड यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले.
ढाणकी नगरपंचायत येथे कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असल्याचे वेळोवेळी नागरिक बोलून दाखवतात. आता तर नगरसेवकानेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे. येथील घनकचरा व्यवस्थापनात नगरपंचायत चा एक बडा अधिकारी पार्टनर असल्याचीही चर्चा शहरात आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील प्रत्येक घरावर स्कॅनर लावण्यात आलेले आहेत. दररोज कचरा उचलण्यात येणाऱ्या कचरा गाडी व कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्यानंतर त्या स्कॅनरला स्कॅन करणे अनिवार्य असताना, शहरात आजच्या स्थितीत दहा दिवसाआड घनकचऱ्याची गाडी येत असून, प्रत्येक घरावरील स्कॅनिंग ही कंत्राटदाराने काही मुले रोजंदारीने लाऊन घरबसल्या स्कॅनिंग करुन घेत असल्याची सुद्धा शहरात चर्चा आहे.घनकचरा व्यवस्थापनाबद्दल एवढी बिकट परिस्थिती ढाणकी शहरात असून, जिल्हाधिकारी महोदय यावर काय ॲक्शन घेणार यातील दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार सदर कंत्राटदारास ब्लॅकलिस्टेड करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




