एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
चिमुकल्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने; विविध सामाजिक संदेशांतून प्रबोधन
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे
येथील एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सुस्वागतम’ गीताने उपस्थितांचे स्वागत केले.
स्नेहसंमेलनात लहान चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते, ‘स्वच्छ भारत-स्वच्छ शहर’, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या विषयांवरून सामाजिक प्रबोधन करत उपस्थितांची मने जिंकली. क्रीडा क्षेत्रात लाँग जंप, कबड्डी, खो-खो व कला कौशल्यात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत पदवीधर झालेल्या माजी विद्यार्थ्यांचाही शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव सुभाष चिन्नावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, मिलिंद चिकाटे, शेख शाहरुख,शेख इरफान, नगरसेवक बाळू योगेवार, प्रफुल चोरे, दुर्गा मंतेवाड, साई मंतेवाड, बक्काजी रावते व नारायण मुटाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघा गंगरपाड व रामधनी यांनी केले, तर आभार यमजेलवार यांनी मानले. मुख्याध्यापक विनोद बास्टेवाड यांच्यासह अमोल पवार, दळवी सर व सर्व शिक्षक वृंदाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



