राजकारण

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा.

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा.

 

 

व शाळा व्यवस्थापन बिनविरोधक अध्यक्ष पदी मारोती लुटे उपाध्यक्षपदी बालसिंग खसावत यांची निवड.

 

ढाणकी प्रतिनिधी =मिलिंद चिकाटे.

 

घरातील भांडीकुंडी विका पण आपल्या मुलांना शिकवा एकही न वर्ग न शिकलेले संत गाडगेबाबा विज्ञानवादी विचार ठेवत होते अंधश्रद्धा सोडा शिक्षण घ्या आणि माणूस म्हणून जगायला शिका असे सांगणारे संतस्वच्छता: ते जिथे जात, तिथे गावे झाडून स्वच्छ करत असत. ‘स्वच्छता हीच सेवा’ हा त्यांचा संदेश होता, ज्यामुळे त्यांना ‘गाडगे’ (झाडू) हे नाव मिळाले.

लोकशिक्षण: निरक्षर असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि अनेक शाळा व शिक्षण संस्था सुरू करण्यास मदत केली.

कीर्तन: त्यांची कीर्तने ही मनोरंजक आणि उद्बोधक असत, ज्यात ते सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवतेचा संदेश देत असत. “गोपाला गोपाला” च्या गजरात ते गाव झाडत आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करत.

समाजसुधारणा: जातीभेद, धर्मभेद यांसारख्या सामाजिक वाईट चालीरीतींवर त्यांनी कठोर टीका केली आणि समतेचा पुरस्कार केला.

दशसूत्री कार्यक्रम: त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, यावर आधारित एक दशसूत्री कार्यक्रम दिला होता.

मानवता: ते मानतात की ईश्वर देवळात नसून लोकांच्या सेवेत आहे. ‘ईश्वर कशात आहे’ याची त्यांना नेमकी जाणीव होती.

वारसा:

त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात अनेक संस्था आणि शाळा उभ्या राहिल्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ त्यांच्या नावाने ओळखले जाते.

त्यांचे जीवन आणि विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनी दिनांक 20. डिसेंबर वार शनिवार बिनविरोध शाळा समिती गठीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जी नवले सर यांनी केले. श्री संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पालक वर्ग आणि शिक्षक वृंद यांचं स्वागत करण्यात आलं त्यावेळी पोलीस पाटील सिताराम रबडे उपसरपंच मारोती पिलवड सामाजिक कार्यकर्ते युवराज साबळे प्रकाश साबळे देवानंद वाडेकर माधव बरदावळ अज्ञान सिंग जाठवे शिक्षण तज्ञ देवसिंग साबळे व सचिव पदी एमपी गायकवाड मुख्याध्यापक यांची निवड करण्यात आली 50% महिला सध्यक्षपदी निवड करण्यात आली व शिक्षण तज्ञ म्हणून चव्हाण सर यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे आभार रमेश राठोड सर यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष व कमिटीच्या स्वागत सत्कार करण्यात आली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *